|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » नगरसेवकाच्या घरात अभियांत्रिकीचा पेपर सोडवणाऱया 26 विद्यार्थ्यांना अटक

नगरसेवकाच्या घरात अभियांत्रिकीचा पेपर सोडवणाऱया 26 विद्यार्थ्यांना अटक 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

एका नगरसेवकाच्या घरात अभियांत्रिकीच्या परीक्षेचा पेपर सोडवणाऱया 26 विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच तेथे उपस्थित असणाऱया प्राध्यापकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

साई इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंगचा बी. ई. सिव्हिल तृतीय वर्षाचा सिव्हिल कन्स्ट्रक्शन अँड ड्रॉईंग या विषयाचा पेपर मंगळवारी झाला. मात्र, तेव्हा विद्यार्थ्यांनी फक्त एकाच प्रश्नाचे उत्तर दिले आणि उर्वरित उत्तरपत्रिका कोरी ठेवली. त्यानंतर सुरेवाडी येथील नगरसेवक सिताराम सुरे यांच्या घरी हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी परीक्षेचा पेपर सोडवताना आढळले. त्यानंतर या सर्वांना पोलिसांना ताब्यात घेतले. यामध्ये तीन विद्यार्थिनींचाही समावेश आहे. ही कारवाई औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Related posts: