|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत साक्षी पुजारी द्वितिय

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत साक्षी पुजारी द्वितिय 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांचे मार्फत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इचलकरंजी हायस्कूलची सातवीच्या वर्गातील विद्यार्थीनी साक्षी राजराम पुजारी हिने दुसरा क्रमांक मिळवला.

या स्पर्धेत तीने ‘मानवता हाच खरा धर्म’ या विषयावर निबंध सादर केला. साक्षीला शाळेच्या स्पर्धा विभाग प्रमुख सौ. सावळवाडे यांचे मार्गदर्शन लाभले. पर्यवेक्षक यु. पी. पाटील, मुख्याध्यापिका सौ. व्ही. एच. उपाध्ये यांचे प्रोत्साहन लाभले. डिकेटीईचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे तसेच टेक्सटाईल कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले यांनी साक्षीच्या या यशाबद्दल तीचे अभिनंदन केले.

 

 

Related posts: