|Saturday, October 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बॉलीवूडची ‘आई’ काळाच्या पडद्याआड

बॉलीवूडची ‘आई’ काळाच्या पडद्याआड 

प्रतिनिधी /मुंबई :

हिंदी, मराठी मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप निर्माण करणाऱया सशक्त अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी पहाटे कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या. बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजता रिमा लागू यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगी अभिनेत्री मृण्मयी लागू आणि जावई विनय वायकुळ असा परिवार आहे.

कोकिलाबेन रुग्णालयातून त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी अकरा वाजता अंधेरी येथील शास्त्राrनगरमधील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी संध्याकाळपर्यंत त्यांनी ‘नामकरण’ या मालिकेसाठी चित्रीकरण केले. महेश भट या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. हीच त्यांची शेवटची व्यक्तिरेखा ठरली.

अभिनयाच्या विविध छटा सक्षमपणे मोठय़ा पडद्यावर साकारणाऱया रिमा लागू यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1958 साली पुण्यात झाला. रिमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे नाव नयन भडभडे होते. बालकलाकार म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. बेबी नयन या नावाने त्यांनी हिरवा चुडा, हा माझा मार्ग एकला अशा अनेक चित्रपटातून बालकलाकार म्हणून भूमिका करून आपल्या हरहुन्नरी अभिनयामुळे प्रसिद्ध होत्या. चित्रपटसफष्टीत एक अभिनेत्री म्हणून पदार्पण करत असतानाच त्यांनी नाटय़ अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर त्या  रिमा लागू या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. परंतु, त्यांचा हा विवाह जास्त काळ टिकला नाही. मुलगी मफण्मयीच्या जन्मानंतर त्या विवेक लागू यांच्यापासून वेगळय़ा झाल्या. परंतु, त्या रिमा लागू याच नावाने परिचित होत्या. शेवटी शेवटी मात्र त्यांनी आपल्याला फक्त रिमा म्हणवून घेणेच पसंत केले होते.

Related posts: