|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अण्वस्त्रांची संख्या वाढविण्याचा भारताचा प्रयत्न

अण्वस्त्रांची संख्या वाढविण्याचा भारताचा प्रयत्न 

पाकिस्तानकडून पुन्हा कांगावा  आंतरराष्ट्रीय न्यायालयातील अपयशातून धडा घेण्यास नकार   

वृत्तसंस्था / इस्लामाबाद

कुलभूषण जाधव प्रकरणानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मानहानी झाल्यानंतर भारताविरोधात खोटे आरोप करण्यास पाकिस्तानने सुरूवात केली आहे. शांततापूर्वक मार्गाने मिळालेल्या अणुसाधनांचा वापर भारत अण्वस्त्रे निर्माण करण्यासाठी करत आहे. नागरी अणुकरार आणि एनएसजी गटाकडून मिळालेल्या साधनांचा वापर भारताकडून अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी करण्यात येत आहे. भारताच्या या कृतीने पाकिस्तानसाठी धोका निर्माण झाल्याचे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नसीफ झकारिया यांनी म्हटले.

पाकिस्तानने याप्रकरणी अगोदरही शंका व्यक्त केली आहे. भारत शांतीपूर्वक मार्गाने या साधनांचा वापर करण्याचे आश्वासन देत अण्वस्त्रनिर्मितीसाठी त्यांचा वापर करतो. भूतकाळातही आणि आताही भारताकडून अण्वस्त्र साधनांचा चुकीच्या पद्धतीने प्रसार करण्याच्या गंभीर मुद्याशी जोडला गेला आहे. याचा पाकिस्तानच्या राष्ट्रीय संरक्षण आणि दक्षिण आशियातील सामरिक संतुलनाला दूरगामी परिणाम होऊ शकतो असे खोटे आरोप पाककडून करण्यात आले आहेत.

झकारिया यांनी प्रसारमाध्यमांच्या अहवाल सादर करत भारतातील वाढत्या अण्वस्त्राच्या धोक्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरून कधीही गंभीरतेने पाहण्यात आले नाही. मात्र प्रत्यक्षात भारताकडील अण्वस्त्रांच्या संख्येत जगातील इतर देशांच्या तुलनेने वेगाने वाढ होत आहे. हार्वर्ड केनेडी स्कूलचा अहवाल सादर करत भारत विदेशातून मिळत असणाऱया अण्वस्त्र साधनांचा वापर असुरक्षित असणाऱया अणुभट्टय़ांमध्ये करणार असल्याचे म्हणण्यात आले आहे.

काश्मीरवरही राग…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काश्मीरमध्ये आपली पथके तैनात करत आहे. या पथकांची जबाबदार गैर काश्मिरी लोकांजवळ देण्यात आली आहे. काश्मीरमधील संघाची वाढती संख्या ही तेथील नागरिकांना धमकविण्यासाठी आणि त्यांना आंदोलनात सहभागी होण्याच्या निर्णयाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष द्यावे असे त्यांनी बिनबुडाचे आरोप केले. 

Related posts: