|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » ताडोबातील रानतळोधी गावात लागलेल्या भीषण आगीत 37 घरे खाक

ताडोबातील रानतळोधी गावात लागलेल्या भीषण आगीत 37 घरे खाक 

ऑनलाईन टीम / चंद्रपूर :

चंद्रपूर जिह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रानतळोधी गावाला लागलेल्या आगीत तब्बल 37 घरे जळून खाक झाली आहेत. एका किराणा दुकानाशेजारी असलेल्या वीजेच्या खांबाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. दुकानाला लागलेली आग पुढे प्रचंड वाढत गेली . यामुळे अनेक घरे जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या आगीत 11 गोठेही खाक झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल उशिरा पोहचल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. अखेर गावकऱयांनीच ही आग विझवली. रानतळोधी हे गाव ताडेबा प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात असल्याने गावात प्रवेश करण्यासाठी विविध प्रकारच्या परावानग्या पार कराव्या लागतात, त्यातच दूरध्वनी अथवा मोबाईल रेंज नसल्याने गावातील आगीची माहिती मिळण्यास अग्निशमन दलाला बराच उशीर झाला. तोवर आगीने रौद्ररूप धारण केले होते.