|Friday, October 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट ‘रिंगण’ 30 जूनला होणार प्रदर्शित

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट ‘रिंगण’ 30 जूनला होणार प्रदर्शित 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

वितरक  मिळाल्याने काही आशयघन सिनेमांपासून प्रेक्षकांना वंचित रहावं लागत आहेया यादीतील काही नावंम्हणजे ‘कासव‘,’दशक्रिया‘ हलाल‘, याच यादीत काही दिवसांपूर्वी अजून एक नाव होतं ‘रिंगण‘. मात्र या दुष्टचक्रातूनरिंगण‘ चित्रपटाची मुक्तता झाली आहे. हा चित्रपट ३० जूनला प्रदर्शित होणार आहे. 

सुखाच्या आणि प्रेमाच्या शोधात निघालेल्या बापलेकाचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटानेकित्येक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या विभागात 63 वा राष्ट्रीय पुरस्कारावररिंगण आपली मोहोर उमटवली त्याबरोबरच 53व्या महाराष्ट्र राज्य स्तरीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्टदिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक), सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायाचित्रदिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट बालकलाकरया पुरस्करांवर आपले नाव कोरले. त्याशिवाय कान्स, स्टट्टगर्ट (जर्मन), लंडन, टोरांटो या काही मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही आपलं वेगळेपण दाखवून दिले होते आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडतो हे पाहावे लागेल. 

Related posts: