|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » स्क्रिझोफेनिया रुग्णांवर बुवा-बाबांचे उपचार

स्क्रिझोफेनिया रुग्णांवर बुवा-बाबांचे उपचार 

तो अवघ्या तिशीतील तरुण. कुटुंबियांनी माझ्याकडे उपचारासाठी आणले. इतर ठिकाणांवरील उपचार संपल्यानंतरच सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होतो. हा ही त्यापैकीच एक. यात वेगळेपण फक्त एवढेच की हा रुग्ण वेगवेगळे डॉक्टरांकडे न जाता कित्येक बुवा-बाबांकडे उपाय करून झाल्यावर शेवटच्या टप्प्यावर माझ्याकडे आला होता, असे डॉ. सागर मुंदडा सांगत होते. आज (बुधवार) जागतिक स्क्रिझोफेनिया दिन असून या विकाराबाबत समाजात जागरुकताच नसल्याची खंत डॉ. मुंदडा यांनी व्यक्त केली. अशा विकाराच्या रुग्णांना मानसोपचारांकडे न नेता बुवा-बाबांकडे उपचारासाठी नेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दक्षिण मुंबईत राहणारा तो चांगला विद्याविभूषित असून नुकताच चांगल्या पदावर कामालाही जाणारा आहे. पाच वर्षापासून त्याला सतत आवाज ऐकू येऊ लागले. थोडय़ाच †िदवसांमध्ये तो स्वतःशी बोलूही लागला. त्याचा विचित्रपणा पाहून घरच्यांनी आधी बाबाचा सल्ला घेतला. या सल्ल्यातून त्यांची पाच वर्षे वाढत गेली. आता त्याचे प्रकरण उपचारापलिकडे गेले असल्याचे मुंदडा म्हणाले.

समाजात स्क्रिझोफेनियाबाबत गैरसमज अधिक असल्यानेच हा विकार दुर्लक्षित होत आहे. तर काही कुटुंबीय मानसोपचार तज्ञांची मदत न घेता बुवा-बाबांचा सल्ला आधी घेत असतात. स्क्रिझोफेनियाच्या रुग्णांना एकटे राहण्यास आवडते, त्यांना सतत आवाज येत असल्याचा भास होत असतो, त्यामुळे ते कोणाशी बोलणेही टाळतात. समाजापासून विभक्त राहण्यास सुरुवात करतात. त्यांना दुसऱयांबद्दल सतत संशय येत असतो. यावर डॉ. मुंदडा म्हणाले की, मेंदूमध्ये होणाऱया काही रासायनिक बदलांमुळे व्यक्तिच्या वागण्यात विचार आणि भावना व्यक्त करण्यामध्ये बदल घडून येणे, समाजात मानसिक आजाराबद्दल गैरसमजामुळे उपचार मिळत नाहीत. मात्र, उपचारातून बरा होऊ शकतो. मानसिक आजारांवर सल्ला आणि उपचार रुग्णांवर तज्ञांकडून वेळेत नियमितपणे उपचार करणे गरजेचे आहे. शिवाय विचित्र ऐकू येणे, दिसणे, विचार करणे अशी मनोवस्था म्हणजेच स्क्रिझोफेनिया असल्याची लक्षणे असतात असे सांगण्यात येत होते. मात्र, तसे नसून मनोविकार तज्ञांच्या मते क्रिझोफेनिया हा विकार पूर्णपणे मेंदू आधारित विकार असून स्पष्टपणे विचार करणे, भावना व्यक्त करणे या मेंदूच्या प्रक्रियांवर हा विकार परिणाम करत असतो. त्यांच्यावर उपचार न झाल्यास यातील धोका वाढू शकतो. मात्र, हे उपचार डॉक्टरकडे जाऊनच व्हावेत. बुवा-बाबांकडे जाण्याने उपचारासाठी विलंब होऊ शकतो.

प्रतिक्रीया

‘स्क्रिझोफेनियाच्या रुग्णांना त्यांचे नातेवाईक बुवा-बाबांकडे उपचारासाठी नेतात. दर दहा रुग्णांमागे तीन ते चार रुग्ण आधी बुवा-बाबांकडे गेलेले असतात. अखेरच्या टप्प्यात मानसोपचाराकडे आणले जाते. तेव्हा उपचार करणे कठीण होऊन बसते.’

डॉ. सागर मुंदडा, मनोसापचार तज्ञ,

बुवा-बाबांच्या नादी लागण्याची कारणे :

रुग्णांच्या विचित्र वागणुकीचा धसका कुटुंबीय घेतात

अशिक्षितपणा आणि विकाराबाबत जागरुकता नसणे

स्क्रिझोफेनिया रुग्णांना न स्वीकारणे

 

 

Related posts: