|Thursday, July 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मध्य प्रदेशमध्ये अपघातात 11 ठार

मध्य प्रदेशमध्ये अपघातात 11 ठार 

वृत्तसंस्था / इंदौर

मध्यप्रदेशमधील निमोच शहरात ट्रक्टर-ट्रॉली उलटून झालेल्या भीषण अपघातात 11 ठार तर 21 भाविक जखमी झाले. मृतांमध्ये 4 लहान मुले व 6 महिलांचा समावेश आहे. सर्वजण मदसारी जिह्यातील खंडेरिया गावातील आहेत. राजस्थानमधील चित्तोडगड येथील सावलिया सेठच्या मंदिरात दर्शनासाठी ते गेले होते. गुरुवारी दुपारी परत येत असता भरधाव ट्रक्टरचे टायर फुटल्याने ट्रॉली उलटून 35 लोक दबले गेले. यातील 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांची प्रकृती गंभीर आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

Related posts: