|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नणदी परिसरातील रस्ते विकासासाठी 5.40 कोटी

नणदी परिसरातील रस्ते विकासासाठी 5.40 कोटी 

वार्ताहर/   एकसंबा

नणदी ग्राम पंचायत व्याप्तीतील रस्ता कामासाठी 5.40 कोटीचा निधी मंजूर केल्याची माहिती  खासदार प्रकाश हुक्केरी यांनी दिली. नणदी येथे बसवेश्वर भवन येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

खासदार हुक्केरी पुढे म्हणाले, 5.40 कोटीतून नणदी गावातील मुख्य रस्ता डांबरीकरण तसेच मलिकवाड बसस्थानक ते नागराळ दरम्यानच्या रस्ता कामासाठी 4 कोटी मंजूर करण्यात आले आहेत आहे. एस. सी वसाहतीमधील रस्ताकामासाठी 40 लाख, नणदी येथील दड्डी मळा ते मिरजे मळा पर्यंतच्या रस्ताकामासाठी 1 कोटी, नणदीवाडी येथील 3 मंदिरांच्या विकासासाठी निधी देणार आहोत. त्यामध्ये मरगुबाई मंदिर, गणपती मंदिर, मारूती मंदिराचा समावेश आहे.  मुस्लिम स्मशानभूमीच्या संरक्षण भिंत बांधणी व कूपनलिका खोदाईचा लवकरच शुभारंभ करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्याभरापासून येथील जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याने नागरिकांना शुद्ध पाण्याची समस्या भेडसावत आहे. यासाठी नदीची पाईपलाईन जोडून त्वरित जलशुद्धीकरण केंद्र सुरू करणार आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी ता. पं. सदस्य मल्लु हवालदार यांनी, आतापर्यंत खासदार   हुककेरी व आमदार हुक्केरी यांनी नणदी गावासाठी कोटय़वधींचा निधी दिल्याने गावाचा विकास झाला आहे. पाण्याची उपलब्धता झाल्याने 600 हून अधिक एकरातील शेती ओलीताखाली आली आहे. सध्या नणदीवाडी मगदूम मळा येथील 40 शेतकऱयांच्या 90 एकर शेती ओलीताखाली येण्यासाठी पाईपलाईनचे काम सुरू आहे. तेही येत्या काळात पूर्ण होणार आहे असे त्यांनी सांगितले.

  यावेळी नणदी ग्राम पंचायत अध्यक्षा मिनाक्षी हवालदार, उपाध्यक्षा सुगंधा मगदूम, शोभा पुजारी, राजू हवालदार, रामचंद्र मडिवाळे, सुनिल सुर्यवंशी, संजय खिराई, आाण्णाप्पा रवळूकेदारी, संतोष लट्टे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

Related posts: