|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बिहारमध्ये 12 वीचा निकाल अत्यल्प

बिहारमध्ये 12 वीचा निकाल अत्यल्प 

पाटणा 

: बिहार शालेय परीक्षा मंडळाद्वारे मंगळवारी जारी करण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या बोर्ड परिक्षेच्या निकालात एकूण 65 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. केवळ 35 टक्के विद्यार्थीच 12 वीच्या परिक्षेत यशस्वी ठरले. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षाच्या निकालात मोठी घसरण दिसून आली आहे. मागील वर्षी बिहार बोर्डाच्या परिक्षेत कॉपी आणि गैरप्रकारांचा खुलासा झाला होता. बिहारमध्ये एकूण 12,40,168 विद्यार्थ्यानी बोर्डाच्या 12 वीच्या परिक्षेत भाग घेतला होता, ज्यापैकी केवळ 4,35,233 जणच उत्तीर्ण होऊ शकले. अनुत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येतील वाढ विज्ञान, कला आणि वाणिज्य या तिन्ही शाखांमध्ये दिसून आली. यावेळी विज्ञान शाखेत 86.2 टक्के गुणांसह सिमुलतला विद्यालयाची विद्यार्थिनी खुशबू कुमारी हिने पहिला क्रमांक मिळविला आहे. तर वाणिज्य शाखेत पाटणाचा प्रियांशू आणि कला शाखेत समस्तीपूरचा गणेश राज्यात पहिला आला आहे. मागील वर्षातील परिक्षेमध्ये टॉपर्स घोटाळ्याचा खुलासा झाला होता.   यानंतर एकीकडे सरकारने कॉपी रोखण्यासाठी कठोर धोरण अवलंबिले होते. तर दुसरीकडे शिक्षण विभागाने मूल्यमापनात देखील कठोरता बाळगली आहे. यावर्षी परिक्षेसाठी कोडिंग यंत्रणा आणि चित्रिकरणाची व्यवस्था करण्यात आली होती.

Related posts: