|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गाडय़ांवर झाड पडून 90 हजाराचे नुकसान

गाडय़ांवर झाड पडून 90 हजाराचे नुकसान 

प्रतिनिधी/ पणजी

पाटो येथे पार्क करून ठेवलेल्या गाडय़ांवर झाड पडल्याने 90 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडय़ावर पडलेले झाड कापून काढले. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास लागलेल्या वारापावसामुळे सदर झाड पडले होते.

झाडा खाली पार्ककरून ठेवलेल्या तीन कार गाडय़ावर झाड पडल्याने कार गाडय़ांचे मोठे नुकसान झाला आहे. जीए-03-पी-0984, जीए-03-एच-1662 व जीए-07-सी-0535 या गाडय़ांचे नुकसान झाले आहे.

Related posts: