|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ठाण्यात डोंगर खचण्याची शक्यता

ठाण्यात डोंगर खचण्याची शक्यता 

पावसाळा उंबरठय़ावर आहे. विविध धोक्यांपासून सावधानता बाळगत पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. ठाणे पालिका प्रशासनाने डोंगराळ भागात राहणाऱया परिसराचा सर्वेक्षण करीत 14 ठिकाणांची यादी तयार केली आहे. यात 26 ठिकाणी मुसळधार पावसात डोंगराचे भूस्खलन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने मात्र संभावित धोक्याच्या ठिकाणी राहणाऱया लोकांना पालिकेने नोटीसा बजावल्या असून घरे खाली करण्याचे आदेशही दिल्याचे समजते.

चार वर्षांपूर्वी पुणे जिल्हय़ात माळीण गावात 30 जुलै 2014 रोजी घडलेल्या घटनेमुळे मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झाली. तर काही वर्षांपूर्वी मुंब्ा्रा आणि कळवा परिसरात डोंगराचा काही भाग झोपडय़ांवर पडल्याने जीवितहानी झाली होती. पावसाळ्यात अशा भूस्खलनाचा धोका संभावत असतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने सर्वेक्षण करीत ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 26 संभावित ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. पालिकेने अनेकदा घरे खाली करण्याचे सांगितल्यानंतरही नागरिक जीव धोक्यात घालून नाईलाजास्तव राहात आहेत. मुंब्ा्रा, लोकमान्यनगर, इंदिरानगर, कळवा येथील आतकोनेश्वरनगरसारखे परिसर संवेदनशील आहेत. प्रभाग समिती निहाय आकडेवारीनुसार रायलादेवी-12, माजिवडाöमानपाडा-2, कळवा-6, मुंब्रा , आणि वर्तकनगरö1 या परिसरात पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.

डोंगर खचण्याची शक्यता असलेली ठिकाणे

संतोषनगर, पाटीलनगर, डक्ट लाईन, रेल्वे कॉलनी, सेंट उलाई स्कूल, हनुमाननगर, शंकर मंदिर, इंदिरानगर टेकडी, रुपादेवी, भास्करनगर, पौंडपाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबानगर, गावदेवी मंदिर (मुंब्रा ), केणीनगर, कैलासनगर, आझादनगर, सैनिकनगर, डोंगरीपाडा, पातलीपाडा, कशेळीपाडा, गुरुदेव आश्रम आणि उपवन या परिसराचा समावेश असल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन प्रमुख संतोष कदम दिली.

14 ठिकाणी जलजमावाची शक्यता

उंच, सखल भागात जलजमाव होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात देवनायर सोसायटी, वंदना सिनेमा, गजानन चौक, गडकरी चौक, देवधर हॉस्पिटल, जिजामाता मार्पेट, पम्पिंग स्टेशन, चव्हाण चाळ, वंफदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी, पंचामफत, आयसीआयसीआय बँक घोडबंदर रोड, विटावा सबवे आणि दिवा गाव यांचा समावेश यांनी सांगून आपत्ती व्यवस्थापन या समस्यांशी झुंजण्यास सज्ज असल्याचे सांगितले.

Related posts: