|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांच्या मान्यतेचा प्रश्न एरणीवर

विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांच्या मान्यतेचा प्रश्न एरणीवर 

वार्ताहर / पाली

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालयांनी मान्यता शुल्क न भरल्याने त्यांच्या अभ्यासक्रमांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पदवीही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विद्यापीठाला अहवाल सादर करण्याची सूचना केली असून लवकरच या बाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांची संख्या सध्या 750 हून अधिक आहे. अनेक महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे मान्यता फीच भरलेली नाही. यात अनेक नामांकित महाविद्यालयांचाही समावेश आहे. तर काहींना नॅकचे ‘ए’ मूल्यांकनही देखील मिळालेले आहे. या महाविद्यालयांनी अभ्यासक्रमांची मान्यता कायदेशीर कचाटय़ात सापडण्याची शक्यता आहे. मान्यता नसतानाही या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून त्यातील अनेकांनी तर पदवीचे शिक्षणही पूर्ण केले आहे. यामुळे विद्यापीठ व महाविद्यालये अडचणीत येण्याची शक्यता आहे. अनेक महाविद्यालयांनी पाच वर्षांपासून शुल्क भरलेले नाही. या बाबत विद्यापीठाकडेही काही अहवाल नसल्याची शक्यता आहे.

या संदर्भात नुकतीच राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विद्यापीठामध्ये बोलावलेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र विद्यापीठाकडून ठोस उत्तर न आल्याने वायकर यांनी येत्या 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एकंदरीतच या सर्व प्रकारामुळे महाविद्यालयांनी मान्यता शुल्क न भरल्याने अभ्यासक्रमांना मान्यता मिळण्यावरही प्रश्नचिन्ह तयार झाले आहे तर काहींचे अभ्यासक्रम पूर्ण होउढन पदवी प्राप्त झाल्याने तेही अडचणीत येण्याची भीती विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.

Related posts: