|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » शेतकऱयांच्या भावनांना पाठिंबा; पण पुढे काय? ः राज ठाकरे

शेतकऱयांच्या भावनांना पाठिंबा; पण पुढे काय? ः राज ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई ः

भाजपा सरकार खोटे बोलून सत्तेवर आले आहे. भाजपाने जनतेची आणि शेतकऱयांची फसवणूक केली आहे. शेतकऱयांच्या भावनेला आमचा पाठिंबा आहे आणि कायमच त्यांच्याबरोबर राहू, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत भाजपावर टीकास्त्र सोडले. मोर्चे, आंदोलने होतात. पण पुढे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ठाकरे म्हणाले, शेतकऱयांचा राग समजू शकतो. जे गिरणी कामगारांचे झाले ते शेतकऱयांचे होऊ नये. त्या संपातही कामगारांना त्रास झाला. सरकारकडे पैसे नाहीत. आता कर्जमाफीसाठी पैसे नाहीत. विरोधात असताना हे माहिती नव्हते का? योजनांना गोंडस नाव देऊन सरकार जनतेला भूलवत आहे. शेतकऱयांच्या आंदोलनाला पक्षांचे लेबल कशाला लावायला हवे. ते विषय योग्य आहे की नाही हे महत्त्वाचे आहे.

पण, पुढे काय?

आपल्याकडे नुसते प्रश्न उभे राहतात, पण त्याची उत्तरे नसतात. मराठा मोर्चे निघाले, पण त्याचे पुढे काय झाले? आपल्याकडे गोष्टी लक्षात ठेवल्या जात नाहीत. निवडणुका येतात. निवडणुकांमध्ये पैसे वाटले जातात, असे सांगत ठाकरे यांनी निशाणा साधला. जवान, किसान मरत आहेत, आणि भाजपा खुशाल आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. अण्णा हजारे यांनी शेतकऱयांना पाठिंबा दर्शविला आहे, याकडे लक्ष वेधले असता कुणाच्या हाताने का होईना. विंचू मेला पाहिजे, अशी टिप्पणी त्यांनी केली.