|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » उन्नत शेतीसाठी तंत्रज्ञान शेतकऱयांच्या बांधापर्यंत पोहचवाः आमदार आबीटकर

उन्नत शेतीसाठी तंत्रज्ञान शेतकऱयांच्या बांधापर्यंत पोहचवाः आमदार आबीटकर 

प्रतिनिधी/ गारगोटी

उन्नत शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱय़ांच्या बांधार्पंत पोहचल्यास शेतकऱयांची उन्नती निश्चित आहे. शेतकऱय़ांनीही हे तंत्रज्ञान आत्मसात करावे असे आव्हान आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले.

गारगोटी ता. भुदरगड येथे पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी भुदरगड यांच्या वतीने उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

तालुका कृषी अधिकारी ए. डी. भिंगारदेवे यांनी या अभियानाची संकल्पना मांडुन यांत्रिकीकरण, सुक्ष्मसिंचन, पीक विमा योजना गटामार्फत घेण्यात येणारी प्रादेशिके इ बाबत उपस्थितांना माहीती दिली.

कृषी महाविद्यालयाचे डॉ. अशोक पिसाळ म्ह्णाले, उत्पादनवाढीच्या दृष्टिने बियाणे बदल, बिजप्रकिया, हेक्टरी रोपसंख्या, रासायनिक खतांचा समतोल वापर, पीक संरक्षण या बाबींवर पीकाचे उपदान अवलंबुन असते.

कार्यक्रमास भुदरगड आजराचे उपविभागीय अधिकारी किर्ती नलवडे, तहसिलदार शितल  देसाई, सभापती सौ, सरिता वरंडेकर, उपसभापती अजित देसाई, प. स. सदस्य़ा सौ. आक्काताई नलवडे यांच्यासह कृषी मित्र व शेतकरी उपस्थित होते. आभार डी. वाय. कांबळे यांनी मानले.