|Thursday, May 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » निश्चलनीकरणाने अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन लाभ : जागतिक बँक

निश्चलनीकरणाने अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन लाभ : जागतिक बँक 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारचा निश्चलनीकरणाची निर्णय यशस्वी ठरल्यास सरकारला मिळणाऱया महसुलात वाढ होण्यास मदत होईल. सरकारच्या या घोषणेमुळे अनेक लोग प्राप्तिकराच्या कक्षेत येतील आणि त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होईल असे जागतिक  बँकेने म्हटले.

जागतिक बँकेच्या अहवालातील ‘इंडियाज ग्रेट करन्सी एक्स्चेंज’ नावाच्या प्रकरणात 2016-17 मध्ये भारतात नोटाबंदी आणि ऍम्नेस्टी स्कीमच्या माध्यमातून अघोषित उत्पन्न प्राप्तिकराच्या कक्षेत आले आहे. यामुळे सरकारचे गेल्या आर्थिक वर्षातील कर उत्पन्न, राज्यांचा हिस्स्याबरोबर अर्थसंकल्पात निश्चित करण्यात आलेल्या 10.8 टक्के अधिक लक्ष्याला पार करत 11.3 टक्क्यांवर पोहोचले आहे. पेट्रोलियम उत्पादनांद्वारे अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात जकात कर जमा करण्यात आला असे म्हणण्यात आले आहे.

निश्चलनीकरणाने अर्थव्यवस्था नियमित आणि मजबूत होण्यास मदत होणार आहे. 2008-09 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या अर्ध्या हिस्स्याचे मोजमाप करण्यात आले नव्हते आणि 82 टक्के लोकांना कृषी क्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्रातून रोजगार मिळाला होता. आता अनौपचारिक अर्थव्यवस्थेचे प्रमाण कमी होत आहे. निश्चलनीकरणापूर्वी अनेक कंपन्या डिजिटल व्यवहारांचा वापर करण्यास टाळाटाळ करत होत्या, मात्र आता त्या नियमित अर्थव्यवस्थेचा हिस्सा बनत आहेत, असे बँकेने म्हटले.

Related posts: