|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » …म्हणे समिती आमदारांना हद्दपार करा!

…म्हणे समिती आमदारांना हद्दपार करा! 

प्रतिनिधी/ चिकोडी

‘जय महाराष्ट्र’ संदर्भात तोंडघशी पडल्यानंतर बिथरलेल्या कन्नडिगांनी पुन्हा थयथयाट करण्यास सुरुवात केली आहे. म. ए. समितीचे आमदार संभाजी पाटील व अरविंद पाटील हे भाषाद्वेष पसरवत आहेत. त्यांचे पद रद्द करून त्यांना हद्दपार करावे, अशी केविलवाणी मागणी काही संघटनांनी मंगळवारी येथील तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे समजते.

बेळगाव महाराष्ट्रात गेले पाहिजे असे वेळोवेळी सांगणाऱया म. ए. समितीच्या या आमदारांमुळे जिह्यात अशांतता व भाषाद्वेष पसरत असल्याचे तकलादू कारण यावेळी पुढे करण्यात आले. कर्नाटकात जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर लोकप्रतिनिधीचे पद रद्द करण्यात येईल, असे बेताल वक्तव्य मंत्री रोशन बेग यांनी केले होते. त्याचे सीमाभागासह महाराष्ट्रात पडसाद उमटले. तर काही ठिकाणी मूठभर कन्नडिगांनी जय महाराष्ट्र असा उल्लेख असलेल्या महाराष्ट्र परिवहनच्या बस अडवण्याचा प्रयत्न केला. त्याची तत्काळ दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने परिवहनच्या लोगोमध्ये कायदेशीररित्या जय महाराष्ट्र असा उल्लेख केला. त्यामुळे हिरेमोड झालेल्यांनी आता समितीच्या आमदारांवर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे.

 मंगळवारी येथील तहसीलदार कार्यालयात मूठभर कन्नडिगांनी निवेदन देऊन समितीचे आमदार संभाजी पाटील व अरविंद पाटील यांच्यावर भाषाद्वेष पसरवण्याचा बेछूट आरोप करत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी हास्यास्पद मागणी करण्यात आल्याचे समजते.

Related posts: