|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अन् जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नाकारले

अन् जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नाकारले 

प्रतिनिधी/ आटपाडी

सांगली जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या घडामोडीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदाची ऑफर होती. परंतू ती ऑफर नाकारून विकासाची भुमिका आणि पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदार अनिलभाऊंच्या नेतृत्त्वाखाली भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. युतीच्या माध्यमातुन जिल्हा परिषदेच्या माझ्या उपाध्यक्षपदाला राजेंद्रअण्णा देशमुख यांनीही होकार दर्शविला होता. त्यामुळे राजकारणविरहीत आटपाडी तालुक्याच्या विकासात योगदान देवु, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली.

आटपाडी-नांगरे मळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील, अनिल पाटील, नंदकुमार नांगरे, मनोज नांगरे, नानासो माळी, आप्पासो माळी, अमोल माळी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुभाष जगताप, संतोष पुजारी, प्रकाश बनसोडे, अभिजित देशमुख, गुलाब नांगरे, विलास शिंदे, शशिकांत शिंदे, भारत पवार, विजय देवकर, दिपक नांगरे, विजय नांगरे, संतोष नांगरे, नंदकुमार कदम, उपअभियंता कुलकर्णी, लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपाध्यक्ष सुहास बाबर म्हणाले, गत विधानसभा निवडणुकीत नांगरेमळय़ामध्ये सर्वप्रथम बैठक झाली. आणि अनिलभाऊंंच्या रूपाने आपणास यश मिळाले. आत्ताही या कार्यक्रमाच्या निमित्ताने विटय़ातही विरोधी गटातील काही कार्यकर्ते आपल्याकडे प्रवेश करत आहेत. आम्ही निवडणुकीपुरतेच राजकारण करतो. अन्य वेळेस भरीव विकासकामांना आमचे प्राधान्य आहे. टेंभुच्या पाण्याची स्वप्नपुर्ती व विकासासाठी आपण भाजपसह युती केली. आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले.

त्यावेळी राजेंद्रअण्णा देशमुख यांनीही माझ्या नावाला होकार दर्शविला. तर आटपाडी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख यांच्याशी विकासकामांबाबत चांगली मैत्री आहे. राज्यात सरकार एकच आहे. त्यामुळे हेवेदावे व राजकारण न करता आम्ही आटपाडी तालुक्यासह जिल्हय़ाचा विकास करण्यासाठी योगदान देवु, अशी ग्वाहीही उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली. त्याचवेळी जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अडीच वर्षासाठी अध्यक्षपदाची ऑफर होती. परंतू ती आम्ही मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी नाकारल्याचेही उपाध्यक्ष सुहास बाबर म्हणाले.

मनोज नांगरे म्हणाले, 2014पासून अनिलभाऊ बाबर, तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाटचाल करत आहोत. नांगरेमळय़ाचा रस्ता, स्मशानभुमि, जिल्हा परिषदेची शाळा खोलीचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदारांनी व अध्यक्षांनी सहकार्य केले. आगामी कालावधीत स्पर्धा परीक्षा केंद्र व शाळेला संरक्षक भिंत देण्याबाबत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी आम्हाला मदत करावी, अशी मागणीही मनोज नांगरे यांनी केली. विजय नांगरे यांनीही मनोगत व्यक्त करत विकासकामांना न्याय देण्याची मागणी केली.

वैभव यादव, गणेश नांगरे, बंडु नांगरे, अमोल नांगरे, विनायक नांगरे, तुकाराम नांगरे, भगवान नांगरे, वसंत हाके, दादासो पाटील, वसंत नांगरे, सुमित नांगरे, भानुदास नांगरे, मधुकर कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts: