|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महिलेला धक्काबुक्की करणाऱया दोघा जणांना अटक

महिलेला धक्काबुक्की करणाऱया दोघा जणांना अटक 

प्रतिनिधी / बेळगाव

बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या महिलेला धक्काबुक्की करून तिला मारहाण केल्याच्या आरोपावरून एपीएमसी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली असून महिलेला धक्काबुक्की करताना सोडविण्यासाठी पुढे आलेल्या युवकालाही मारहाण करण्यात आली आहे.

अक्षय सुनील भोसले (वय 24, रा. नेहरूनगर), श्रीनिवास गजानन किल्लेदार (वय 31) रा. कंग्राळी खुर्द अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी रात्री उशिरा या दोघा जणांना अटक करून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्यावर एपीएमसी पोलीस स्थानकात भादंवि 323, 354, सहकलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केएलई इस्पितळासमोरील बसथांब्यावर बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या एका महिलेला धक्काबुक्की करण्यात आली. हा प्रकार पाहून सोडविण्यासाठी आलेल्या नारायण नामक व्यक्तीला या दोघा जणांनी मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱयांनी अक्षय व श्रीनिवास यांना अटक केली असून त्यांच्या जवळील मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.      

Related posts: