|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘त्या’ महिलांकडून सव्वा दोन लाखाचे दागिने जप्त

‘त्या’ महिलांकडून सव्वा दोन लाखाचे दागिने जप्त 

प्रतिनिधी / बेळगाव

पाच दिवसांपूर्वी एपीएमसी पोलिसांनी अटक केलेल्या चार महिलांना पोलीस कोठडीत घेऊन कॅम्प पोलिसांनी त्यांच्याजवळून 2 लाख 30 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत. कॅम्प पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दोन घरफोडय़ा केल्याची कबुली या महिलांनी दिली आहे.

शोभा अशोक बैलपट्टी (वय 19), शांतले उर्फ गंगम्मा बसवराज चलवादी (वय 25), शंकरम्मा दुर्गप्पा उर्फ उय्या मुग्गोळ (वय 23), गंगव्वा शंकराप्पा आलट्टी (वय 35 चौघीही रा. वंटमुरी जनता प्लॉट) अशी त्यांची नावे आहेत. कॅम्पचे पोलीस निरीक्षक सुदर्शन पट्टणकुडे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.

8 जून रोजी एपीएमसी पोलिसांनी या चार महिलांना अटक केली होती. कॅम्प  पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात जानेवारी व फेब्रुवारीमध्ये दोन घरफोडय़ा केल्याची कबुली या महिलांनी दिली होती. त्यामुळे कॅम्प पोलिसांनी या चारही महिलांना पोलीस कोठडीत घेऊन त्यांची कसून चौकशी केली. आणि चोरी प्रकरणातील दागिने जप्त करण्यात आले.

खडेबाजारचे एसीपी जयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. बी. कांबळे, साहाय्यक  पोलीस उपनिरीक्षक बी. आर. डुग, एम. वाय. हुक्केरी, अरुण कांबळे, एस. एस. राजण्णावर, महेश पाटील, लक्ष्मी मावरकर, शंकर शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.

24 जानेवारी 2017 रोजी लक्ष्मी टेकडी परिसरातील अशोक फिशानी यांच्या घराचे कुलुप फोडून 4  लाख 95  हजार रुपये किमतीचे दागिने चोरण्यात आले होते. तर 13 फेब्रुवारी 2017 रोजी क्रांतीनगर, गणेशपूर येथील अन्नपूर्णा शिवापूर यांच्या घराचे कुलुप फोडून सोन्याचे दागिने व रोकड लांबविण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणांचा तपास लागला आहे.

Related posts: