|Saturday, April 20, 2019
You are here: Home » उद्योग » 10 सरकारी बँकांच्या विलीनीकरणाची तयारी

10 सरकारी बँकांच्या विलीनीकरणाची तयारी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय स्टेट बँकेमध्ये सहा बँकांचे विलीनीकरण करण्यात आल्यानंतर अन्य सरकारी बँकांचे विलीनीकरण करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. या नवीन विलीनीकरणासाठी 4 मोठय़ा आणि 6 लहान बँकांची निवड करण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयातील सुत्रांनी सांगितले. पहिले विलीनीकरण पंजाब नॅशनल बँक आणि अलाहाबाद बँक यांचे 31 जुलैला होण्याचा अंदाज आहे.

सरकारने युनायटेड बँक, युको बँक, युनियन बँक या 6 पैकी तीन बँकांची विलीनीकरणासाठी निवड केली आहे. या तिन्ही बँकांचे कोणत्याही मोठय़ा बँकेत विलीनीकरण करण्यात येईल. पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक या मोठय़ा बँकेमध्ये लहान बँकांचे विलीनीकरण करण्यात येईल.

सरकारी बँकांचे विलीनीकरण करण्यात येणार असल्याची बातमी आल्याने बँकांच्या समभागात खरेदी झाली. यामुळे समभागात वधारण्यास मदत झाली. अलाहाबाद बँक, आंध्र बँक, सिंडिकेट बँक, आयडीबीआय बँक, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा या सरकारी बँकांच्या समभागात दिवसअखेरीस 7.38 ते 1.77 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

या बँकांचे विलीनीकरण करत आंतरराष्ट्रीय पातळीवरील बँका तयार करण्याची सरकारची योजना आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील 4 ते 5 बँका तयार करण्यात येतील. सहा बँकांचे विलीनीकरण करण्यात आल्याने एसबीआय जगातील 50 मोठय़ा बँकांत सहभागी झाली आहे. या वर्षाच्या अखेरीसपर्यंत या विलीनीकरणाच्या प्रस्तावास अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात येईल.

Related posts: