|Sunday, May 26, 2019
You are here: Home » Top News » रामदेव बाबांविरोधात अजामीनपात्र वॉरंट

रामदेव बाबांविरोधात अजामीनपात्र वॉरंट 

ऑनलाईन टीम  / रोहतक :

योगगुरू रामदेव बाबा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.

रोहतक येथील जिल्हा न्यायालयाने रामदेव बाबांविरोधात वॉरंट काढले असून, पोलिस अधीक्षकांना रामदेव बाबांना अटक करून न्यायालयात आणण्याचे आदेश दिले आहेत. रामदेव बाबा यांनी भारत माता की जय न म्हणणाऱयांचा शिरच्छेद करायला हवा, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरून काँग्रेसचे माजी मंत्री सुभाष बत्रा यांनी खटल दाखल केला होता. या प्रकरणी अनेकवेळा सुनावणी होऊनही रामदेव बाबा सुनावणीसाठी गैरहजर राहिले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. न्यायाधीश हरिश गोयल यांनी रामदेवबाबांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Related posts: