|Thursday, May 24, 2018
You are here: Home » Automobiles » Mercedes दोन नव्या आलिशान कार लाँच

Mercedes दोन नव्या आलिशान कार लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जर्मनची प्रसिद्ध लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडिज बेंजने खास आपल्या ग्राहकांसाठी आपल्या दोन नव्या कार लाँच केल्या आहेत. मर्सिडिज AMG G 63 एडिशन 463 आणि AMG GLS एडिशन 63 लाँच केली आहे.

मर्सिडिज बेंझ इंडियाने सांगितले, एसयूव्ही पोर्टफोलियोमध्ये वाहनांची संख्या वाढून आठ झाली आहे. याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोलांड फोल्गर यांनी सांगितले, भारतामध्ये एमजी पोर्टफोलियोला मजबूत करण्यात आले आहे. या दोन नव्या आलिशान कार ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल. या कारचा स्पीड 210 किमी/प्रतितास असणार आहे.

Related posts: