|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » Top News » 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी सात आरोपींचा आज निकाल

1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी सात आरोपींचा आज निकाल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील 1993 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सात दोषी आरोपींचा आज निकाल लागणार आहेत. याबाबत विशेष टाडा न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.

या आरोपींमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कयूम यांचा समावेश आहे. या सर्वांवर आरोप निश्चित केले असून ते दोषी आहेत की नाही हे विशेष टाडा न्यायालय स्पष्ट करणार आहे. साखळी बॉम्बस्फोटात एकूण 129 आरोपी असून 100 आरोपींना टाडा न्यायलयाने दोषी ठरवून 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपाची शिक्षा त्यांच्यावरील आरोपांनुसार सुनावली आहे. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहिम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत. 12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्यूमुखी पडले होते. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 21 कोटी रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्सच वापर केला गेला. या बॉम्बस्फोटाचे मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली.

 

Related posts: