|Monday, January 21, 2019
You are here: Home » उद्योग » डिजिटल अर्थव्यवस्था 1 लाख कोटी डॉलर्सची

डिजिटल अर्थव्यवस्था 1 लाख कोटी डॉलर्सची 

चार वर्षात करणार टप्पा पार  आयटी कंपन्यांनी पुढाकार घेण्यासाठी प्रसाद यांचे आवाहन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सहजपणे हाताळता येणाऱया तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि त्यासाठी आवश्यक असणारे वातावरण निर्मिती करण्यात आल्याने डिजिटल अर्थव्यवस्थेत प्रचंड प्रमाणात वाढ होईल. देशातील माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारतातील डिजिटल अर्थव्यवस्था पुढील चार वर्षात 1 लाख कोटी डॉलर्सचा टप्पा पार करेल, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले. देशात आयटी आणि आयटीबरोबर सलग्न सेवा, ई-व्यापार, विद्युत उत्पादने, डिजिटल देयक आणि सायबर सुरक्षा यासारख्या माध्यमातून देशात अब्जावधी डॉलर्सच्या संधी आहेत. मात्र एक लाख कोटी डॉलर्सची डिजिटल अर्थव्यवस्था बनणे हे केवळ आपले स्वप्न नाही असे त्यांनी म्हटले.

पुढील 7 वर्षात भारतातील डिजिटल अर्थव्यवस्था 1 लाख कोटी डॉलर्सची होईल याबाबत आपल्याला कोणतीही शंका नाही. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक संधी असल्याने सात वर्षांपर्यंत वाट पाहण्याची गरज असल्याचे वाटत नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशातील अर्थव्यवस्था 3-4 वर्षात हा टप्पा का पार करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले. देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजाबरोबरच्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी नास्कॉमचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर, गुगल इंडियाचे राजन आनंदन, विप्रोचे रिषद पेमजी, इंडियन सेल्युलर नॅशनलचे प्रमुख पंकज मोहिंदरू उपस्थित होते.

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने 10 लाख कोटीचे उत्पन्न गाठले असून निर्यातीत 7.5 लाख कोटीचा टप्पा पार केला. आता देशातील डिजिटल विकासासाठी देशाला स्वतःच्या मॉडेलची आवश्यकता आहे. सायबर सुरक्षेमध्ये कमी किमतीच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कंपन्या भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर हब निर्माण करू शकतात, असे प्रसाद यांनी म्हटले.

Related posts: