|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मराठा विद्यार्थ्यांचे निकाल रोखल्यास आमच्या स्टाईलने आंदोलन

मराठा विद्यार्थ्यांचे निकाल रोखल्यास आमच्या स्टाईलने आंदोलन 

प्रतिनिधी/ सोलापूर

मराठा आरक्षणाबद्दल न्यायालयानेच स्थगिती दिली आहे. त्यामुळे जात पडताळणीचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न करता तात्काळ निकाल द्यावा, अन्यथा आमच्या स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे यांनी दिला.

   शैक्षणिक व सामाजिकदृष्टया मागास इएसबीसी प्रवर्गासाठी मराठा समाजास न्यायालयाने 16 टक्के आरक्षण जाहीर पेले होते. त्यानुसार आरक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्यानंतर न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली होती. त्यामुळे केवळ जात पडताळणीच्या दाखल्यासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे निकाल रोखले अशी बातमी दै. तरूणभारत संवाद या वृत्तपत्रात प्रसिध्द झाली होती आणि या बातमीची संभाजी आरमार, संभाजी ब्रिगेड या संघटनांनी दखल घेत या मराठा विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

  गुरूवारी, शंभुराजे युवा संघटनेचे कार्यकर्ते व मराठा समाजातील काही विद्यार्थी व विद्यार्थिंनीनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या निकाल त्वरीत द्यावा या मागणीचे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. निवेदन दिल्यानंतर ही बातमी प्रसिध्द झाल्यानंतर प्रमुख संघटनांनी या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

  शंभर टक्के आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने आहोत. मराठा आरक्षणाबददल न्यायालयानेच स्थगिती दिली आहे तरी महाविद्यालय व विद्यापीठाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे निकाल रोखून ठेवणे हे  चुकीचे आहे. यामुळे कॉलेजचा अज्ञान दिसून येतो. आणि यामध्ये कोर्टाचाही अवमान आहे. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूना आम्ही निवेदन देवू याबाबत कोणतीही दखल न घेतल्यास संभाजी आरमार आमच्या स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे श्रीकांत डांगे म्हणाले. 

  संभाजी ब्रिगेडचे शाम कदम म्हणाले, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण तर हवेच. पण न्यायालयानीच आरक्षणाविषयी स्थगिती दिली आहे. त्यामुळे केवळ जात पडताळणीचे दाखले सादर करा यासाठी शासनानी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये. आरक्षणाचा प्रश्न कोर्टात आहे. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान करणे ही गंभीर बाब आहे. ज्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला आहे त्यांच्यासोबत संभाजी ब्रिगेड संघटनेचा शंभर टक्के पाठिंबा असणार आहे. सोमवारी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंना रितसर निवेदन देणार आहोत जर या निवेदनाची दखल न घेतल्यास संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा शाम कदम यांनी दिला.

Related posts: