|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » …तर कोविंद यांना पाठिंबा देऊ : मायावती

…तर कोविंद यांना पाठिंबा देऊ : मायावती 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जर विरोधी पक्षाकडून प्रभावी दलित उमेदवार जाहीर केला गेला नाही तर आमचा रामनाथ कोविंद यांना पाठिंबा असेल, असे बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सांगितले.

राष्ट्रपतिपदासाठी एनडीएकडून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. एनडीएकडून राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. एनडीएच्या उमेदवाराला आमचा पाठिंबा दिला गेला नसला. मात्र, रामनाथ कोविंद हे दलित प्रवर्गातील नेते असल्याने आमचा त्यांना पाठिंबा असेल. मात्र, विरोधी पक्षांनी आपला दलित उमेदवार जाहीर केला तर पाठिंबा काढू असेही मायावती म्हणाल्या.

दरम्यान, एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या वर्धापनदिनी आपली भूमिका स्पष्ट करतील असे सांगण्यात येत आहे.

Related posts: