|Thursday, May 24, 2018
You are here: Home » Top News » भाजपने एकतर्फी निर्णय घेतला ; राष्ट्रपती उमेदवारीवरुन काँग्रेसची प्रतिक्रिया

भाजपने एकतर्फी निर्णय घेतला ; राष्ट्रपती उमेदवारीवरुन काँग्रेसची प्रतिक्रिया 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

एनडीएने राष्ट्रपतिपदासाठी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. भारतीय जनता पक्षाने घेतलेला हा निर्णय एकतर्फी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी दिली.

दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत नबी यांनी ही प्रतिक्रिया दिली. एनडीएकडून राष्ट्रपतिपदासाठी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली. एनडीएने कोविंद यांना उमेदवारी दिली हा निर्णय एकतर्फी असल्याचे नबी म्हणाले. या नावाची घोषणा करण्यापूर्वी आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना दिली गेली नाही. हा निर्णय पूर्णपणे एकतर्फी असल्याचे नबी म्हणाले.

Related posts: