|Thursday, May 24, 2018
You are here: Home » Top News » अनावश्यक वादात पडू नका, कोविंद यांना पाठिंबा द्या : नायडू

अनावश्यक वादात पडू नका, कोविंद यांना पाठिंबा द्या : नायडू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अनावश्यक वादात पडणे उचित नाही, सर्वांनी थोडा विचार करुन रामनाथ कोविंद यांना मदत करावी असे आम्हाला वाटते, असे केंद्रीय नगर विकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी सांगितले.

राष्ट्रपतिपदासाठी एनडीएकडून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी कोविंद हे दलित प्रवर्गातील असल्याने त्यांना आमचा पाठिंबा आहे. मात्र, विरोधी पक्षांनी दलित उमेदवार दिला तर हा पाठिंबा काढून घेऊ असे त्या म्हणाल्या. तसेच भाजपने रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीबाबत आम्हाला कोणतीही कल्पना दिली नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.

दरम्यान, सर्वांनी थोडा विचार करुन कोविंद यांना मदत करावी, अनावश्यक वादात पडू नका, असे नायडू म्हणाले.

Related posts: