|Thursday, May 24, 2018
You are here: Home » क्रिडा » आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर 

वृत्तसंस्था/ लंडन

पुढील वषी होणारी सातवी टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून ती आता 2020 मध्ये घेतली जाईल. सर्व अव्वल संघ 2018 मध्ये द्विदेशीय मालिकांमध्ये व्यग्र राहणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आयसीसीसीमधील एका वरि÷ सूत्राने सांगितले की, पुढील वषी होणारी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा आता 2020 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. मात्र या स्पर्धेचे ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आले नसल्याचे सूत्राने स्पष्ट केले. ‘होय, पुढील वषीची टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. मात्र ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी घेणार याचा अजून निर्णय झालेला नाही. आयसीसी सदस्य असलेले देश पुढील वर्षी द्विदेशीय मालिका खेळण्यात गुंतलेले असणार आहेत, हेच हा निर्णय घेण्याचे प्राथमिक कारण आहे. भरगच्च कार्यक्रमामुळे या स्पर्धेचे आयोजन करणे शक्मय होणार नाही,’ असे या सूत्राने सांगितले. 2020 मध्ये मात्र ही स्पर्धा निश्रितपणे घेतली जाणार आहे. ती स्पर्धा दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्टेलियात घेतली जाईल. स्पर्धा लांबणीवर टाकण्याचे दुसरे कारण म्हणजे आयसीसीच्या अनेक स्पर्धा नियोजित असून या स्पर्धांमध्ये पुरेसे अंतर ठेवले जाण्याची गरज असल्याचे मत सदस्य राष्ट्रांनी व्यक्त केले आहे, असेही या सूत्राने पुढे सांगितले.

यापूर्वीच्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा दक्षिण आफ्रिका (2007), इंग्लंड (2009), विंडीज (2010), लंका (2012), बांगलादेश (2014), भारत (2016) येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. जवळजवळ सर्व सदस्य देशांच्या मंडळांनी फ्रँचायजी आधारित टी-20 लीग स्पर्धा सुरू केल्या असल्या तरी अतिशय लोकप्रिय असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेची आवड कमी होणार नाही. याशिवाय द्विदेशीय मालिकांमधून संबंधित मंडळांना मोठा महसूल मिळतो. त्यातील महत्त्वाचे उत्पन्न प्रक्षेपण हक्कातून मिळते. विशेषतः भारताने एखाद्या देशाचा दौरा केल्यास यजमान मंडळाला टीव्ही प्रक्षेपण हक्कातून लाखो डॉलर्सची कमाई होते.

टी-20 विश्वचषक स्पर्धा भरविली नाही तर आयसीसीला फटका बसणार नाही का, असे विचारता सूत्राने सांगितले की, आयसीसीला अजिबात नुकसान होणार नाही. कारण टी-20 लीग्स स्पर्धा अनेक ठिकाणी भरविल्या जात आहेत. त्यामुळे रसिकांची उत्सुकता कायम राहील, असे ते म्हणाले. पुढील वर्षी भारताचा भरगच्च कार्यक्रम असून दक्षिण आफ्रिका दौऱयाने त्याची सुरुवात होईल. त्यानंतर इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध ‘अवे’ मालिका होणार आहेत.

सोमवारी आयसीसीची वार्षिक परिषद होणार असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप प्रस्तावावर त्यात प्रामुख्याने चर्चा होणार आहे. सर्व फॉरमॅटमध्ये किमान एक विश्व चॅम्पियनशिप स्पर्धा आयसीसीने प्रस्तावित केली आहे.

Related posts: