|Thursday, May 24, 2018
You are here: Home » उद्योग » भारतात उतरणार 50 नवीन रिटेलर्स

भारतात उतरणार 50 नवीन रिटेलर्स 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय पातळीवरील 50 पेक्षा अधिक मध्यम पातळीवरील रिटेलर्स लवकरच भारतात पाय रोवणार आहेत. सध्या रिटेलर्सची संख्या कमी आहे आणि ज्या बाजारपेठा विस्ताराने मोठय़ा नाहीत, त्यांवर लक्ष हे ब्रॅण्ड करतील. यामध्ये वॉलस्ट्रीट इंग्लिश, पास्ता मेनिया, कोरेस, मिगातो, एविसु, लश एडिक्शन, मेल्टिंग पॉट, योगर्ट लॅब आणि मोनालिसा यासारख्या बॅण्डचा समावेश आहे. या कंपन्या 3 हजार दालने उघडणार असून 30 ते 50 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करतील. यातील अनेक कंपन्या या अमेरिका आणि सिंगापूरच्या आहेत.

भारतातील रिटेल क्षेत्रातील उदार धोरण आणि बॅण्डस् उत्पादनांसाठी बाजारपेठेतील अमर्यादित संधीचा फायदा घेण्याचा या कंपन्यांचा प्रयत्न आहे. यामध्ये 18 ब्रॅण्डस् खाद्यपदार्थ, 13 अपॅरल, 13 लाईफस्टाईल आणि काही शिक्षण क्षेत्रातील आहेत. या बॅण्ड्सना आपल्या देशात संकटांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे आपला विस्तार वाढीसाठी भारतासारख्या बाजाराचा विचार करत आहेत. सरकारने बी टू बी ई व्यापार आणि देशातच तयार होणारे खाद्यपदार्थ विक्रीस 100 टक्के मालकीची परवानगी दिली आहे.

 

Related posts: