|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » कोपर्डी बलात्कारप्रकरण ; मुख्यमंत्र्यांचे नाव साक्षीदारांच्या यादीत !

कोपर्डी बलात्कारप्रकरण ; मुख्यमंत्र्यांचे नाव साक्षीदारांच्या यादीत ! 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कोपर्डी बलात्कारप्रकरणी बचाव पक्षाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साक्षीला बोलावण्याची तयारी केली आहे. बचावपक्षाच्या वकिलांनी साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांच्या नावाचा समावेश केला आहे.

संपूर्ण राज्याला हादरवून सोडलेल्या कोपर्डी बलात्कार आणि खूनप्रकरणी न्यायालयात जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. यातील तिसरा आरोपी असलेल्या नितीन भैलुमेने आपली साक्ष देताना त्याच्यावरील सर्व आरोप नाकारले. त्यानंतर बचावपक्षाचे वकील प्रकाश अहेर यांनी साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली. साक्षीदारांच्या या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश करण्यात आला.