|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नाडगीताच्या नव्या फतव्यामुळे सखेद आश्चर्य

नाडगीताच्या नव्या फतव्यामुळे सखेद आश्चर्य 

प्रतिनिधी / बेळगाव

महापालिका स्थायी समित्यांच्या निवडणुकीवेळी प्रभारी प्रादेशिक आयुक्त तथा जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी नाडगीत ऐकवण्याचा आदेश दिला. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच नाडगीत वाजविण्यात आले. यामुळे महापालिका सभागृहात नाडगीत वाजविण्याच्या नव्या फतव्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात आले. 

बेळगाव शहरातील मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार जिल्हाधिकारी एन.जयराम यांनी वेळोवेळी केला आहे. मराठी भाषिकांवर अन्याय  करून आपली खुर्ची कायम ठेवण्याचा प्रयत्न आजपर्यत जिल्हाधिकाऱयांनी केला आहे. महापालिकेत नाडगीत वाजवून सरकारदरबारी शाबासकी मिळविण्यासाठी हा नवा प्रयोग केला असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी नगरसेवकांमधून ऐकावयास मिळाल्या. सध्या बदलीची प्रक्रिया सुरू असल्याने पुन्हा मुदतवाढ करून घेण्यासाठी   हा नवा वाद उकरून काढला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

महापालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता असल्याने मराठी भाषेमधून कामकाज चालते. शनिवारी महापालिका स्थायी समिती बैठकीवेळी जिल्हाधिकारी एन.जयराम यांनी नाडगीत वाजवून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शाळा, समारंभामध्ये नाडगीत म्हणण्याची प्रथा आहे. पण आता महापालिका सभागृहात नाडगीत वाजविण्याचा फतवा जिल्हाधिकाऱयांनी काढला असल्याने मनमानीपणा निदर्शनास आला आहे. कानडीकरणाची सक्ती करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. ज्यांनी नाडगीत म्हणण्याची सूचना केली, त्या जिल्हाधिकाऱयांना नाडगीत येत नसल्याची बाब चक्हाटय़ावर आली. वास्तविक पाहता, मातृभाषा किंवा मातृभूमी प्रेम हे ह्म्दयामधून व्यक्त केले जाते. नाडगीत म्हणण्याऐवजी उभे राहून ध्वनीफित वाजवून राज्याबद्दल असलेले बेगडी प्रेम दाखवून दिले.

स्थायी समिती निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले, पण यावेळी ध्वनीफितीची गरज भासली नाही. जनगणमन…. ही राष्ट्रगीताची ध्वनीफित न वाजवता सर्वांनी म्हणून राष्ट्रप्रेम हे सर्वाच्या हदयात असल्याचे दाखवून दिले. पण हीच बाब नाडगीताबद्दल दिसली नाही. यामुळे ध्वनीफित लावून राज्यप्रेम व्यक्त केले जावू शकत नाही, तर ते हदयात असावे लागते, अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

Related posts: