|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » Top News » सुकमात जवान-नक्षलवाद्यांमध्ये चकमक ; 3 जवान शहीद

सुकमात जवान-नक्षलवाद्यांमध्ये चकमक ; 3 जवान शहीद 

ऑनलाईन टीम / सुकमा :

छत्तीसगडच्या सुकमा जिह्यात नक्षलवाद्यांविरोधात सुरु करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’मध्ये भारतीय लष्करातील 3 जवान शहीद झाले असून, 5 जवान गंभीर जखमी झाले आहेत. भारतीय लष्कराच्या जवानांनी प्रत्युत्तरादरम्यान केलेल्या गोळीबारात 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले.

यापूर्वी छत्तीसगडमध्ये रविवारी जखमी झालेल्या जवानांच्या बचावकार्यासाठी इंडियन एअरफोर्सचे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले होते. मात्र, नक्षलवाद्यांनी हेलिकॉप्टरवरही हल्ला केला. असे असलेतरी देखील अद्याप याबाबतची नुकसानची माहिती मिळाली नाही. दरम्यान, आज झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या जवानांच्या उपचारांसाठी रायपूर येथे आणण्यात येणार आहे.

Related posts: