|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सहारा संस्थेमार्फत ईद निमित्त साहित्य वाटप

सहारा संस्थेमार्फत ईद निमित्त साहित्य वाटप 

प्रतिनिधी / इचलकरंजी

येथील सहारा सेवाभावी संस्थेच्या वतीने रमजान ईदनिमित्त साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणुन अखिल भारतीय मानवअधिकार संघटनेचे राज्य सचिव दिलावर मकानदार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी नगरसेवक मदन कारंडे होते. यावेळी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना दिलावर मकानदार म्हणाले, सहारा सेवाभावी संस्था समाजातील गोरगरीब व उपेक्षित वंचितांसाठी आधारवड ठरले आहे. या संस्थेने केलेले कार्य समाजासाठी आर्दशवत आहे. यावेळी मुस्लिम समाजातील गरीब व गरजू अशा 170 कुटुंबाना साडी व खिरीच्या साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.  सांगलीचे जेष्ठ सामजिक कार्यकर्ते गोविंद खटावकर यांनी त्यांच्या मनोगतामध्ये संस्थेच्या तिसऱया वर्धापन दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गोरगरीबांच्या घरामध्येही मोठया उत्साहाने हा सण साजरा होईल असे सांगितले. यावेळी उदय शिरोळकर यांचा ‘लेक जन्मली’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी ऍड. राजेंद्र भाले, नागेश शेजाळे, सादिक इनामदार, मन्सूर अत्तार, खंडेराज कुरणे, इर्शाद मुजावर, संतोष कांबळे, असलम मुल्ला, बद्रेआलम देसाई, शशीकांत गायकवाड, शौकत मानगावे, सै. सुनिता पाटील, जयश्री चौगुले, पौर्णिमा देसाई, राधा कांबळे, शोभा वसवाडे यांच्यासह संस्थेचे सभासद व मुस्लिम बांधव उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्षा सुरेखा काटकर यांनी केले. सचिव इस्माईल ऐनापुरे यांनी आभार मानले.

Related posts: