|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कार अपघातात चालक गंभीर

कार अपघातात चालक गंभीर 

वार्ताहर/ लोकूर

 लोकूरपासून पश्चिमेस एक किलोमीटर अंतरावरील राज्य महामार्गावर कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे 5.20 च्या दरम्यान घडली. सिद्धाप्पा एन. पिटापोर (वय 40, रा. मालळ्ळी, ता. सूरपूर) गंभीर जखमीचे नाव आहे. तर कारमधील निंगाप्पा आर. मोहर (वय 45) व देवेंद्र एस. दोडमणी (वय 41) दोघेही राहणार मालळ्ळी हे किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच महामार्गावर आप्पाचीवाडीनजीक स्कॉर्पिओचा टायर फुटून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, सिद्धाप्पा हे दोडमणी यांच्या नातेवाईकाला मिरज येथील खासगी दवाखान्यात शनिवारी दाखल करुन पहाटे निंगाप्पा व देवेंद्र यांना घेऊन मालळ्ळीच्या दिशेने जात होते. दरम्यान, लोकूरनजीक आले असता चालक सिद्धाप्पा यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार उलटून विरुद्ध दिशेस उभी राहिली. अपघात झाल्यानंतर या मार्गावरुन मंगसुळीला खंडोबा देवस्थानकडे जाणाऱया भाविकांनी तत्काळ जखमींना कागवाड शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेत कारचे किरकोळ नुकसान झाले.

आप्पाचीवाडी येथे कारला अपघात

कोगनोळी : सांगलीहून भरधाव वेगाने बेळगावच्या दिशेने जाणाऱया स्कॉर्पिओ गाडीचा मागील टायर अचानक फुटल्याने झालेल्या अपघातात चालक जखमी झाल्याची घटना महामार्गावरील आप्पाचीवाडी फाटय़ानजीक घडली. हा अपघात शनिवारी रात्री 8 च्या सुमारास घडला. सुदैवाने कारमधील अन्य चार प्रवासी सुखरुप आहेत. पण वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सांगलीहून बेळगावकडे स्कॉर्पिओ गाडी (एमएच 10 एएफ 9900) जात होती. आप्पाचीवाडी फाटय़ावर आल्यावर गाडीचा मागील टायर अचानक फुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटून पलटी घेत महामार्गावरील दुभाजकावर धडकली. स्कॉर्पिओमधील चालकाच्या हाताला दुखापत झाली आहे. इतर चौघेजण सुखरुप आहेत. घटनेची माहिती मिळताच पुँजलॉईड कंपनीच्या कर्मचाऱयांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतुकीसाठी रस्ता खुला केला. घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार निंगणगौडा पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. अपघातग्रस्त वाहन पाहून मोठी हानी झाल्याची चर्चा परिसरात सुरु होती.

Related posts: