|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सुरक्षेच्या मुद्यावरून रोखली मानसरोवर यात्रा : चीन

सुरक्षेच्या मुद्यावरून रोखली मानसरोवर यात्रा : चीन 

बीजिंग

 सिक्कीममध्ये नाथु ला खिंडीद्वारे होणाऱया कैलास मानसरोवर यात्रेच्या मुद्याप्रकरणी भारताच्या संपर्कात असल्याचे चीनने सोमवारी म्हटले आहे. मागील शुक्रवारी चीनने भाविकांना या मार्गावरून पुढे जाण्यापासून रोखले होते. भूस्खलन आणि पावसामुळे मार्ग खराब झाल्याचे कारण चिनी अधिकाऱयांनी दिले आहे. भारतीय यात्रेकरूंच्या सुरक्षेबाबत चिंता होत्या, यामुळेच त्यांना रोखण्यात आल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दोन्ही देश मंत्रालय या मुद्यावर संपर्कात असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग सुहांग यांनी सांगितले. 47 भाविकांची पहिली तुकडी 19 जून रोजी नाथु ला खिंडीतून सीमा ओलांडणार होती, परंतु खराब हवामानामुळे त्यांना शिबिरातच थांबावे लागले होते. 23 जून रोजी चिनी अधिकाऱयांनी त्यांना रस्त्याच्या दुरवस्थेचे कारण देत प्रवेश देण्यास नकार दिला होता.