|Thursday, October 18, 2018
You are here: Home » Top News » मुंबई – पुणे एक्सप्रेसवर वाहतूक ठप्प

मुंबई – पुणे एक्सप्रेसवर वाहतूक ठप्प 

ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतुक रोखण्यात आली आहे. पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आडोशी बोगद्याजवळ दोन्ही बाजूची वाहतुक थांबवण्यात आली.
 सध्या ठिसूळ झालेली दरड काढण्याचे काम सुरू आहे. यासाठी दोन्ही बाजूकडील वाहतुक दुपारी सव्वा बारापासून थांबवण्यात आली आहे. हे काम पूर्ण व्हायला किती अवधी लागेल हे अनिश्चित आहे. महामार्गावरील वाहतुक टप्याटप्याने बंद करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीही अशाचपद्धतीने दरड हटवण्यासाठी वाहतून थांबवण्यात आली होती.

 

Related posts: