|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणात भाच्याकडून मामाचा खून

चिपळुणात भाच्याकडून मामाचा खून 

प्रतिनिधी/ चिपळूण

वयोवृध्द मामाचा भाच्याकडून खून झाल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी 9.15 वाजता कळकवणे येथे घडली आहे. या प्रकरणी संशयित म्हणून भाच्यास अलोरे-शिरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  जगन्नाथ बाबू चव्हाण (70, कादवड-देऊळवाडी) असे खून झालेल्याचे, तर विनोद बाबा सकपाळ (30, कळकवणे) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. चव्हाण व सकपाळ हे नात्याने मामा-भाचे असून दोघेही अविवाहित आहेत. आठ दिवसांपूर्वीच चव्हाण हे विनोद याच्याकडे राहण्यास गेले होते आणि रविवारी चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे त्यांचे भाऊ जयवंत बाबू चव्हाण यांना समजले. त्यानुसार ते कळकवणे येथे गेले.

  यावेळी चव्हाण यांच्या अंगावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्या. त्यामुळे विनोद व त्यांच्यात काहीतरी झाले असावे आणि त्यातूनच त्याने त्यांचा खून केला असावा, अशी तक्रार जयवंत चव्हाण यांनी दिली आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. या बाबतचा तपास अलोरे-शिरगावच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव करीत आहेत. 

Related posts: