|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » विंडीजचा भारताला धक्मका

विंडीजचा भारताला धक्मका 

होल्डरचे 5 बळी, रहाणे-धोनीची अर्धशतके वाया

वृत्तसंस्था/ अँटिग्वा

कर्णधार जेसन होल्डरने भेदक माऱयावर मिळविलेल्या पाच बळीमुळे विंडीजने चौथ्या वनडे सामना भारतावर केवळ 11 धावांनी विजय मिळवित मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताची आघाडी आता 2-1 अशी झाली आहे.

कुलदीप यादव, हार्दिक पंडय़ा व उमेश यादव यांच्या शिस्तबद्ध माऱयापुढे वेस्ट इंडीजला चौथ्या वनडे सामन्यात भारताने 50 षटकांत 9 बाद 189 धावांवर रोखले. त्यानंतर अजिंक्मय रहाणे व महेंद्रसिंग धोनी अर्धशतके झळकवल्यानंतरही इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने भारताचा डाव 49.4 षटकांत 178 धावांत आटोपला. रहाणेने 91 चेंडूत 7 चौकारांसह 60 तर धोनीने संथ फलंदाजी करीत 114 चेंडूत केवळ एका चौकारासह 54 धावा जमविल्या.  हार्दिक पंडय़ाने 20, जडेजाने 11 धावा केल्या. विंडीजचा कर्णधार होल्डर भारताचा कर्दनकाळ ठरला. त्याने 27 धावांत 5 बळी मिळविले. जोसेफने 2, विल्यम्स, बिशू, नर्स यांनी एकेक बळी मिळविले.

विंडीजने नाणेफेक जिंकून यावेळी भारताला प्रथम फलंदाजी दिली. या सामन्यात भारताने आपल्या संघात तीन बदल केले युवराज सिंग, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार यांच्या जागी दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी यांना स्थान मिळाले. शमीला 2015 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर वनडेमध्ये प्रथमच खेळण्याची संधी मिळाली. विंडीजने फक्त एक बदल करताना मिग्युएल कमिन्सच्या जागी अल्झारी जोसेफला स्थान दिले.

विंडीजने या सामन्यात विकेट राखण्यावर जास्त भर दिला. त्यामुळे धावांचा गती त्यांना वाढविता आली नाही. यापेक्षा त्यांनी वेगळी योजना आखली नसल्याचे दिसून आले. मध्यफळीतील फलंदाजांची सावध फलंदाजी केल्याने पुन्हा एकदा कुलदीप यादवने त्याचा लाभ उठविला. त्याला हार्दिक पंडय़ाने प्रारंभी जलद ऑफस्पिनर्स टाकून पूरक साथ दिली. नंतर त्याने नेहमीप्रमाणे गोलंदाजी केली आणि 40 धावांत 3 बळी मिळविले. उमेश यादवने तळाच्या मध्यफळीला जखडून ठेवले. यामुळे विंडीजला शेवटच्या 83 चेंडूत एकही चौकार नोंदवता आला नाही. 36 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्यांनी शेवटचा चौकार ठोकला होता. त्यांच्या पाच फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. पण त्यांना त्याचे मोठय़ा खेळीत रूपांतर करता आले नाही.सावध सुरुवात करीत लेविस व काईल होप यांनी 57 धावांची सलामी दिली. हार्दिकने होपला बाद करून ही जोडी फोडली. त्याने 63 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. आणखी 23 धावांची भर पडल्यानंतर लेविसही तंबूत परतला. त्याला कुलदीपने 35 धावांवर कोहलीकरवी झेलबाद केले.

त्याने 60 चेंडूंच्या खेळीत 2 चौकार, 2 षटकार मारले. यानंतर ठरावीक अंतराने विंडीजचे गडी बाद होत गेले. शाय होपने 39 चेंडूत 25, चेसने 34 चेंडूत 24, मोहम्मदने 20 धावा केल्या. याशिवाय कर्णधार होल्डरने 11, बिशूने 15 धावा काढल्या. भारतातर्फे उमेश यादवने 36 धावांत 3 तर हार्दिकने 40 धावांत 3 बळी मिळविले. कुलदीपने 2 बळींसाठी 10 षटकांत 31 धावा दिल्या. दीर्घ काळानंतर वनडेत पुनरागमन केलेल्य शमीला मात्र एकही बळी मिळविता आला नाही.

संक्षिप्त धावफलक : विंडीज 50 षटकांत 9 बाद 189 (लेविस 60 चेंडूत 35, काईल होप 63 चेंडूत 35, शाय होप 25, चेस 24, मोहम्मद 20, होल्डर 11, बिशू 15, अवांतर 11, उमेश यादव 3-36, हार्दिक पंडय़ा 4-40, कुलदीप यादव 2-31), भारत 49.4 षटकांत सर्व बाद 178 (रहाणे 91 चेंडूत 60, धोनी 114 चेंडूत 54, हार्दिक पंडय़ा 21 चेंडूत 21, जडेजा 11, केदार जाधव 10, होल्डर 5-27, जोसेफ 2-46, विल्यम्स 1-29, नर्स 1-29, बिशू 1-31).