|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आणखी 52 जण हद्दपार पाच टोळय़ांना दणका

आणखी 52 जण हद्दपार पाच टोळय़ांना दणका 

प्रतिनिधी/ सांगली

 मटका, जुगार टोळय़ांच्या हद्दपारीचे सत्र अद्याप सुरूच असून सोमवारी जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी आणखी पाच टोळय़ातील 52 जणांना दोन वर्षासाठी सांगली जिल्हयातूत तडीपार केले. आतापर्यंत पंधरा टोळय़ातील तडीपार केलेल्या मटका आणि जुगारींची संख्या 140 झाली आहे. संघटित गुन्हेगारी आणि मटका जुगार घेणाऱया टोळय़ा मोडीतच काढण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

 एका बाजूला आपण मटका जुगार टोळय़ांचे कंबरडे मोडण्याचे प्रयत्न करत असतानाच स्थानिक बिट हवालदार आणि प्रभारी अधिकारी कर्तव्यात कसूर करत असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा पोलीस आणि अधिकाऱयांना दोन वर्षे वेतनवाढ रोखणे, कर्तव्यात कसुरीबद्दल विभागीय चौकशी करणे आदी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रमुख शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

  पोलीस कायदा कलम 55 नुसार आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा वापर करत संघटीतपणे मटका जुगार खेळणाऱयांना दणका देण्यास सुरूवात केली आहे. कदाचित राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.

 सोमवारी केलेल्या तडीपारीमध्ये मिरजेतील सारवान गल्लीतील वसीम मुल्ला, कमानवेस माळी गल्ली मिरज येथील अस्लम गुडूलाल बेग, भिलवडी येथील रणजित तानाजी आरते, कुंडलमधील दिलीप नारायण पवार आणि आष्टा येथील प्रविण बाळु माने रा.धनगर गल्ली आष्टा यांच्या टोळयांचा समावेश आहे.

 प्रविण बाळू माने याच्या टोळीत मधुकर कापसे, चव्हाणवाडी आष्टा, विश्वजित कापसे,चव्हाणवाडी आष्टा, महादेव जाधव दत्तवसाहत आष्टा, सुमित माने शिवाजी चौक आष्टा, राजाराम वावरे आष्टा, लखन मोरे आष्टा, तानाजी अण्णा माने बागणी यांचा समावेश आहे. तर मिरज शहर पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावामध्ये वसीम दिलावर मुल्ला याच्या टोळीत मक्सुद घोडीमार रा.गुरूवार पेठ, रमजान शरीकमसलत दर्गा परिसर, महामुद्दीन पिनतोड रा.तेली गल्ली, तोहीद शेख,स्टेशन रोड मिरज, राकेश आलकुंटे सांगलीवेस मिरज, फैजपीर आगा दर्गा परिसर, सतीश कांबळे झारीबाग, रफिक निजाम शेख, दिंडीवेस, गौस नूरमहंमद खलीफा कापसेकर बिल्डींग, महेबूब अब्दुलकरीम शेख किल्ला भाग, अमिरहामजा खुदबुद्दीन पटवेगार, मीरासाहेब शमशुद्दीन मुतवल्ली मुजावर गल्ली, वासीम यासीन शेख वय 31 रा.रेवणी गल्ली, नुरमहंमद गौस जिंदी झारीबाग, देवीदास लक्ष्मण कांबळे नदीवेस, बौध्दवसाहत, रमेश दादू साठे संजय गांधी झोपडपट्टी, आणि उल्हास नगुर मसूरकर रा. कोल्हापूर चाळ मिरज अशा अठरा जणांचा समावेश आहे.

  महात्मा गांधी चौक पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावामध्ये अस्लम बेग याच्यासह सलीम खान, अलंकार कॉलनी, अमर प्रकाश कलगुटगी, मंगळवार पेठ,चर्च रोड, नियाज मीरासाहेब बैरागदार कमानवेस, सरफराज हुसेन पठाण रा.मंडले प्लॉट शास्त्री चौक, जावेद अल्लाबक्ष बेग माळी गल्ली कमानवेस आणि जयकुमार शिवाप्पा शास्त्री सांगलीवेस या मिरजेतील आठ जणांच समावेश आहे.