|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला 

प्रतिनिधी/ नवारस्ता

कोयना पाणलोट क्षेत्रात सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे शिवसागर जलाशयातील पाण्याची पातळी दीड टीएमसीने वाढली असून धरणात 11 हजार 34 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. धरणात मंळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 33.17 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

मंगळवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत कोयनानगर येथे 60 (1312), नवजा 48 (1474), महाबळेश्वर 18 (1267) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीपातळी 2082 फूट 4 इंच, 634.695 मीटर व पाणीसाठा 33.17 टीएमसी एवढा झाला आहे. सध्या धरणात 11 हजार 34 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. गेल्या चोवीस तासांत कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात दीड टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात रात्रीचा पावसाचा जोर वाढत असून दिवसभरात मात्र पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. नवजा परिसरातील ओझर्डे धबधब्यासह इतर छोटे-मोठे धबधबेही ओसांडून वाहू लागले असून कोयनानगर परिसराने हिरवा शालू परिधान केला असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत मंडलनिहाय झालेला पाऊस व कंसात आजपर्यंतचा पाऊस  मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे- पाटण 18 (277), मोरगिरी 47 (394), ढेबेवाडी 1 (78), तारळे 4 (83), मरळी 28 (196), चाफळ 5 (77), तळमावले 3 (86), कुठरे 3 (98), म्हावशी 10 (192), मल्हारपेठ 5 (83).

Related posts: