|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » leadingnews » मुंबईतील शेतकऱयांची नावे लवकरच जाहीर करणार : मुख्यमंत्री

मुंबईतील शेतकऱयांची नावे लवकरच जाहीर करणार : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कर्जमाफी लाभार्थ्यांच्या जिल्हानिहाय आकडेवारीत कोणतीही गडबड नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच मुंबईतील लाभार्थी शेतकऱयांच्या नावांची यादीही जाहीर करु, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यातील शेतकऱयांना कर्जमाफी दिल्याची आकडेवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार मुंबईतील 813 शेतकऱयांना कर्जमाफी दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई शहर जिह्यात 694 शेतकऱयांना तर मुंबई उपनगर जिह्यात 119 शेतकऱयांना कर्जमाफी देण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या या आकडेवारीत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर मुंबईतील लाभार्थी शेतकऱयांची नावे लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.