|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » निवडणूक आयुक्त नियुक्ती : कायदा व्हावा

निवडणूक आयुक्त नियुक्ती : कायदा व्हावा 

सर्वोच्च न्यायालयाची सूचना : आयुक्त नियुक्तीत असावी पारदर्शकता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीत पारदर्शकता सुनिश्चित करणारा कायदा संसदेने तयार करावा अशी सूचना केली. त्याचबरोबर न्यायालयाने आतापर्यंत नियुक्त झालेल्या सर्व निवडणूक आयुक्तांचे कौतुक करत त्यांना निष्कलंक ठरविले. या दिशेने संसद कायदा तयार करेल अशी अपेक्षा असली तरीही अजूनपर्यंत असे झाले नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीप्रकरणी हस्तक्षेप करत स्वतःच नियम तयार करून आयुक्तांची स्वायत्तता कायम का ठेवली जाऊ नये असा प्रश्न न्यायालयाने विचारला. असता सरकारने त्याचे उत्तर दिले. जर संसदेला कायदा तयार करण्याची गरज वाटत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाने विधायिकेत हस्तक्षेप करून नियम तयार करावेत का असे सरकारने म्हटले. यावर न्यायालयाने विस्तृत सुनावणीनंतर निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. न्यायालय आता याप्रकरणी दोन महिन्यानंतर सुनावणी करेल. याप्रकरणी न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सुनावणी करत आहेत. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीकरता नियम-कायदे असणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आयुक्तच निष्पक्ष निवडणूक करविण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात असे खंडपीठ म्हणाले. सद्यस्थितीत पंतप्रधान आणि मंत्रिगटाकडून निवडणूक आयुक्तांबात निर्णय घेतला जातो. त्यांच्या शिफारसीवरच राष्ट्रपती आयुक्ताची नियुक्ती करतात.