|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रेल्वे स्थानकाच्या जीर्ण भागाचे पावसाळय़ानंतर काम -सुग्रीव मीना

रेल्वे स्थानकाच्या जीर्ण भागाचे पावसाळय़ानंतर काम -सुग्रीव मीना 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील मुख्य प्रवेशद्वाराच्या पोर्चचा काही भाग मंगळवारी कोसळला आहे. बांधकाम जुने झाल्यामुळे आणि ओलाव्यामुळे हा भाग कोसळला असून पावसाळय़ानंतर स्थानकातील जुन्या भागाचे काम करण्यात येणार आहे अशी माहिती स्टेशन प्रबंधक सुग्रीव मीना यांनी दिली.

कोल्हापूर रेल्वे स्थानक मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून करण्याची चर्चा आहे. पण आहे त्या स्थानकाची चांगली दुरुस्तीही आतापर्यंत झालेली नाही. काही महिन्यापूर्वीच स्थानकातील काही कामे करण्यात आली होती. पण त्या कामाला गुणवत्ता नसल्याचे मंगळवारी कोसळलेल्या सिलिंगमुळे पुढे आले आहे. स्थानकात प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार असून या प्रवेशद्वाराच्या पोर्चमधील सिलिंगचा काही भाग मंगळवारी पहाटे अचानक कोसळला. सुदैवाने यावेळी स्थानकात प्रवाशांची वर्दळ नव्हती यामुळे कोणीही जखमी झाले नाही. यानंतर काही वेळाने रेल्वेच्या कर्मचाऱयांनी कोसळलेल्या सिलिंगचे साहित्य तिथून हलवले.

या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी प्रवाशातून नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळय़ात स्थानकात अनेक ठिकाणी गळती लागते. यामुळे इमारतीला धोका निर्माण झाला आहे. तरीही रेल्वेकडून या ऐतिहासिक वास्तूकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप प्रवाशातून होत आहे.

Related posts: