|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भात रोप लागण अंतिम टप्प्यात

भात रोप लागण अंतिम टप्प्यात 

वार्ताहर /आवळी बुदुक :

राधानगरी तालुक्यात गेल्या आठवडय़ापासून पाऊस कोसळत असून ओढे व नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे रोपलागणीच्या कामाला वेग आला असून पश्चिम भागातील शेतकरी रोप लागणीच्या कामात मग्न झाला आहे.

पाऊस नसल्यामुळे रोपलागणीची कामे संथ गतीने सुरू होती. मात्र गेल्या आठवडय़ापासून कमी अधिक प्रमाणात पाऊसाने हजेरी लावल्याने खोबंळलेली काम सुरू झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या भागात चिखलगुठ्ठा पध्दतीने भात रोप लागण करण्यासाठी रोटर व औत यांचा वापर केला जात आहे. रोप लागणीसाठी मजूरांची कमतरता भासत असल्याने सामुदायिक पैरा पध्दतीने ही कामे आटोपून घेण्याकडे शेतकऱयांचा कल आहे.

Related posts: