जम्मूत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

ऑनलाईन टीम / जम्मू – काश्मीर :
जम्मू – काश्मीरमध्ये सीमा रेषेवर घुसखोरीचा डाव सैन्याच्या सतर्क जवानांनी उधळून लावला. सैन्याच्या कारवाईत नौगममध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
रविवारी रात्री सीमा रेषेवर नौगाम सेक्टरमध्ये पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना सतर्क जवानांनी रोखले. जवनांच्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. सीमा रेषेवर अजूनही शोधमोहिम सुरू असल्याचे सैन्यातील अधिकाऱयांनी सांगितले. सोमवारी दुपारपर्यंत शोधमोहिम सुरू होती.