|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » थायलंडची अथाया थिटीकुल सर्वांत तरुण गोल्फ विजेती

थायलंडची अथाया थिटीकुल सर्वांत तरुण गोल्फ विजेती 

वृत्तसंस्था/ बँकॉक

पाटय़ा येथे नुकत्याच झालेल्या महिलांच्या युरोपियन थायलंड गोल्फ स्पर्धेत थायलंडच्या 14 वर्षीय अथाया थिटीकुलने विजेतेपद मिळविले. महिलांच्या युरोपियन गोल्फ टूरवर अजिंक्यपद मिळविणारी ही थायलंडची सर्वांत कमी वयाची हौशी महिला गोल्फपटू ठरली आहे. तिने 14 वर्षे, 4 महिने आणि 19 दिवस वयोमनात ही स्पर्धा जिंकली आहे.

यापूर्वी न्यूझीलंडची महिला गोल्फपटू लिडिया को हिच्या नावावर हा विक्रम नोंदविला गेला होता. 2013 साली न्यूझीलंड खुल्या महिलांच्या खुल्या गोल्फ स्पर्धेत को ने आपल्या वयाच्या 15 वर्षे, 9 महिने आणि 17 दिवस पूर्ण केली असताना जेतेपद मिळविले होते.