|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » दहशतवाद्यांना 56 इंचाची छाती दाखवण्याची हीच वेळ : संजय राऊत

दहशतवाद्यांना 56 इंचाची छाती दाखवण्याची हीच वेळ : संजय राऊत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

काश्मीरमधील दहशतवाद्यांना 56 इंचाची छाती दाखवण्याची हीच वेळ आहे. आता कोणतीही चर्चा न करता हल्ल्याचा बदला घेण्याची गरज असल्याचे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार राऊत बोलत होते. ते म्हणाले, अमरनाथमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा दिल्लीच्या मजबूत आणि हिंमतबाज सरकारवर हल्ला आहे. त्यामुळे आता काश्मीरमधील दहशतवाद्यांना 56 इंचाची छाती दाखवण्याची हीच वेळ आहे. तसेच आता याबाबत कोणतीही चर्चा न करता या हल्ल्याचा बदला घेण्याची भूमिका घ्यावी, असे राऊत म्हणाले. दरम्यान, या हल्ल्याचा फक्त ट्विटरवर निषेध करुन चालणार नाही. हा हल्ला दिल्लीच्या मजबूत आणि हिंमतबाज सरकारवर असल्याचे ते म्हणाले.