|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बालसाहित्यिक गोविंद गोडबोले यांना बाबुराव शिराळे पुरस्कार

बालसाहित्यिक गोविंद गोडबोले यांना बाबुराव शिराळे पुरस्कार 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेतर्फे दिवंगत बाबुराव शिराळे बालसाहित्यिक पुरस्कार जेष्ठ बालसाहित्यिक गोविंद गोडबोले यांना जाहिर झाला आहे. दरवर्षी दिल्या जाणाऱया या मानाच्या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्क आणि सन्मानपत्र असे आहे. गुरूवारी पुणे येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांच्या हस्ते हा पुरस्कार समारंभ साजरा होणार आहे.

  गेली 48 वर्षे गोविंद गोडबोले लहान मुलांसाठी लिखान करत आहेत. त्यांची 77 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यातील 3 पुस्तके राज्य आणि 3 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत. मुलांसाठी 500 हुन अधिक कथा कथनाचे कार्यक्रम सादर केले आहेत. आकाशवणीच्या 30 वर्षाच्या काळात त्यांनी बालविभाग सांभाळला आहे. तसेच मुलांचे वाचन वाढावे यासाठी 1 रूपयात पुस्तक ही बाल साहित्याला लाभलेली देणगी आहे. यातील 5 पुस्तकांच्या 1 लाख 22 हजार प्रति विकल्या गेल्या आहेत. बाल साहित्याबरोबरच माध्यम तज्ञ आणि माध्यम सल्लागार म्हणून ते ओळखले जातात.

Related posts: